![]() |
बार्शी विशेष : राजकीय कारणावरुन तलवार आणि लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची फिर्याद गणेश पोपट शिंदे (वय ४३) रा. राऊत चाळ, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसांत दिली आहे.
गणेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १६ डिसेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास मी घराकडे जात असताना, राजविजय तालीम जवळ राहुल यादव उर्फ डंग्या, माठ्या मोहिते व पेशा रणझुंजारे यांनी माझी मोटरसायकल थांबवून, नगरपालिकेच्या संबंधात काय बोलतेस असे म्हणून राहुल यादव उर्फ डंग्या यांने डोक्यात तलवार मारुन, तसेच माठ्या मोहिते व पेशा रणझुंजारे यांनी लाकडी दांडक्याने मारुन मला जखमी केले. उपचारासाठी मी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल आहे. अशी फिर्याद दि. १८ डिसेंबर रोजी दाखल झाली आहे.
