संत गाडगेबाबांच्या संदेशाचे पालन करुन वृक्ष संवर्धन समितीने वाहिली आदरांजली

Admin
0

 

tree conservation committee Barshi paid respects to Sant Gadge Baba

tree conservation committee Barshi paid respects to Sant Gadge Baba

बार्शी विशेष : स्वच्छता, अंधश्रध्दा आणि अनिष्ट प्रथांविषयी जनजागृती करत आपले आयुष्य वेचलेल्या संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून, बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीने गाडगेबाबांनी दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करुन, त्यांना आज आदरांजली वाहिली. 

यानिमित्ताने वृक्ष संवर्धन समितीने आज विशेष स्वच्छता मोहिम राबवून, श्री शिवाजी महाविद्यालय रस्त्यावरील 'चाफा पॉईंट' व रस्ता दुभाजकामधील गवत काढले. तसेच तो परिसर स्वच्छ झाडून तेथील झाडांना पाणी दिले.

'आपला परिसर स्वच्छ करुया, आपले शहर स्वच्छ आणि सुंदर बनवूया' असा संदेश यावेळी शहरातील नागरिकांना देण्यात आला. 

या मोहिमेत उमेश काळे, उमेश नलवडे, राहुल तावरे, राणा देशमुख, संतोषकुमार गायकवाड, सुनिल फल्ले, अजित नडगिरे, बुगडे सर, विरेंद्र भंडे, अक्षय काटकर, अमृत खेडकर, अक्षय घोडके, महेश बकशेट्टी, अक्षय भोईटे, महेश पायघन, योगेश गाडे यांनी श्रमदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)