![]() |
धर्म रक्षा, सनातन संस्कृती सेवा व समर्पणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वैदिक हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.
नरिमन पॉईंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व नारायण महाराज नारायणपूर, स्वामी रितेशानंद व वैदैही तमन यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी हा सोहळा संपन्न झाला.
त्याचबरोबर सद्गुरू नारायण महाराज, अर्थशास्त्रज्ञ व विचारवंत सुब्रमण्यम स्वामी, स्वामी कर्मवीर, स्वामी गिरीशनंद सरस्वती, महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन व डॉ. उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना देखील राज्यपालांच्या हस्ते 'हिंदुत्व के आधारस्तंभ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात वैदेही तमन यांनी लिहलेल्या जीवनचरित्राचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सद्गुरू ॠतेश्वर महाराज, गोरखनाथ महाराज, श्रीरंग महाराज, गिरीश पाटील, मेघराज बरबडे, महालिंग मंठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


