हॉटेलबाहेर लावलेली दुचाकी चोरट्याने पळविली

Admin
0

 

Incident on Barshi Latur Bypass Road where a two-wheeler parked outside the hotel was stolen by a thief

A two-wheeler parked outside the hotel was stolen by a thief

बार्शी विशेष : जेवण करुन बाहेर येईपर्यंत हॉटेलबाहेर लावलेली दुचाकी चोरट्याने पळविली. बार्शी लातूर बायपास रोडवर ही घटना घडली.

महेश दासू पाटील (वय ३१) रा. तावडी, ता. बार्शी हे त्यांच्या एका मित्रासह बार्शी लातूर बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर हँडल लॉक करुन लावलेली त्यांची मोटरसायकल जेवण करुन बाहेर येईपर्यंत हँडल लॉक तोडून चोरट्याने पळविली. ही घटना दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १० च्या दरम्यान घडली.

महेश पाटील यांनी याबाबतची फिर्याद बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)