![]() |
| Pradeep Mali has been appointed as Barshi Taluka Head of the Central Consumer Protection Committee |
बार्शी विशेष : केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्यावतीने बार्शी तालुकाध्याक्षपदी प्रदीप माळी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामजिक कार्याची दखल घेत, समाजाबद्दल असणारी तळमळ व सामान्य माणसांच्या हक्कासाठी असणारी त्यांची धडपड बघता या पदासाठी योग्य निवड करण्यात आली असे मत समितीचे कार्याध्यक्ष दिपक तांबे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देतेवेळी व्यक्त केले.यावेळी सर्व उपस्थितांनी प्रदीप माळी यांच्या नावाला एकमताने पसंती दिली.
बार्शी तालुकाध्याक्षपदी निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना माळी म्हणाले की, मला दिलेल्या जबाबदारीचा मी लोकहितासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. या पदावर माझी निवड झाल्यामुळे आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.समाजात अशा अनेक समस्या आहेत की, ज्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होतो. या पदाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करेन व योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.या प्रसंगी उपस्थितांनी माळी यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

