या मिरवणुकीतून विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्यात आले होते. जागतिक तापमान वाढीचे आव्हान सध्या जगासमोर आहे, त्यासाठी झाडे लावण्याचे व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन या मिरवणुकीतून करण्यात आले. तसेच "बेटी पढाओ, बेटी बढाओ" हा अमूल्य संदेशही या मिरवणुकीच्या माध्यमातून देण्यात आला. सर्व महापुरुषांच्या प्रतिमा असणारे व एकात्मतेचा संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. यावेळी 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ही मिरवणूक भगवंत मंदिर येथून चाटे गल्ली, पटेल चौक, दाणे गल्ली, ऐनापूर मारुती मंदिर, शाहीर अमर शेख चौक, पांडे चौक या मार्गावरुन निघून जुना गांधी पुतळा येथे विसर्जित करण्यात आली.
मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे मिरवणूक काढता आली नव्हती, त्यामुळे यंदा निघालेल्या मिरवणूकीतून प्रचंड उत्साह दिसून आला. या मिरवणुकीचे आयोजन शहिद हजरत टिपू सुलतान (र. अ.) मध्यवर्ती मिरवणूक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
