शिवसेना उध्दव ठाकरे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न

Admin
0




https://www.barshivishesh.in
The organizational meeting of the Shiv Sena Uddhav Thackeray group concluded

बार्शी: बार्शी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बोलाविलेली बैठक बार्शी  येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता पार पडली. या बैठकीत बूथ लेव्हलपासून सुरुवात करणे, बूथनिहाय शाखाप्रमुख निवड करणे, गणप्रमुख, विभागप्रमुख अशी संघटनेची बांधणी करणेबाबत चर्चा झाली. 

यावेळी जेष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेण्यात आले.गांव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक अशी प्रभावी मोहीम राबविण्यात येणार असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनखाली पक्ष बांधणीवर भर देणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांनी सांगितले. 

या बैठकीस शिवसेनेतील जुने निष्ठावंत शिवसैनिक तसेच तालुका संघटिका मंगलाताई पाटील, सुनीताताई जाधव, तालुका उपप्रमुख राजभाऊ पाटील, पांडुरंग गपाट, विभागप्रमुख बाळासाहेब अंबुरे, बाबासाहेब शिंदे, विष्णु घोडके, बापू सुरवसे, ज्ञानेश्वर थोरात, भीमराव गणदूरे, विजय माने, गणेश खडके, रामराजे संकपाळ, दीपक जाधव, युवासेना बार्शी शहरप्रमुख हेमंत रामगुडे, गणेश लंगोटे तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)