लाकडी वासा डोक्यात मारल्यामुळे युवक जखमी सोलापूर रोड येथील घटना

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

A youth was injured after being hit on the head with a wooden stick

बार्शी विशेष : किरकोळ कारणांवरुन लाकडी वासा डोक्यात मारल्यामुळे युवक जखमी झाल्याची घटना सोलापूर रोड येथे घडली. उमेश रमेश ओहोळ (वय २८) रा. बगले बरड, सोलापूर रोड, बार्शी असे त्या जखमी युवकाचे नांव असून, सध्या तो सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

त्याने दिलेल्या जबाबानुसार, माझा चुलत भाऊ मंगेश याच्यासोबत शेजारी रहाणारे योगेश ननवरे व सागर कापुरे यांच्यात दि. ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातचे सुमारास, किरकोळ कारणावरुन बाचाबाची होऊन भांडण झाले. त्यावेळी मी त्यांचे भांडण सोडविले होते. 

त्यानंतर मी रात्री ११ चे सुमारास सोलापूर रोड येथील जवाहर दाळ मिलसमोर एकटाच झोपलो होतो. दि. ६ सप्टेंबरच्या पहाटे ५ च्या सुमारास मी उठलो तेव्हा, योगेश ननवरे व सागर कापुरे हे माझ्याजवळ आले. त्यावेळी आल्याआल्या योगेशने लाकडी वासा माझ्या डोक्यात मारण्यास सुरवात केली. मी उजवा हात आडवा लाऊन अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने वासा माझ्या हातावर मारला. माझ्या डाव्या डोळ्याच्या वर वासा मारल्यामुळे डोक्यातून रक्त येऊ लागले. सोबत असलेल्या सागर कापुरेने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी करुन, तुझ्या भावाला सांग आता तुझा नंबर आहे, अशी धमकी देऊन ते दोघे निघून गेले. 

त्यास, बार्शीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करुन, उस्मानाबाद येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून उजवा हात मोडल्यामुळे तसेच भुवई फाटून आठ टाके पडल्याने व डोळ्याला आतून जखम झाली असल्यामुळे पुढील उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जाण्यास सांगितले. सध्या त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत.

याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)