शिक्षकाची मोटरसायकल घराबाहेरुन गेली चोरीला

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

A teacher's motorcycle was stolen from outside the house

बार्शी विशेष : घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. याबाबतची फिर्याद प्रभाकर संभाजी चव्हाण (वय ५४) रा. म्हाडा कॉलनी, गाडेगांव रोड, बार्शी यांनी दिली आहे. ते जवळा निजाम, ता. परांडा येथील विद्यालयात शिक्षक आहेत. 

दि. ७ सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांची हिरो डिलक्स मोटरसायकल क्र. एमएच२५-एएफ-५९३८ ही रात्री नऊचे सुमारास घराबाहेर  हँडललॉक करुन लावली, आणि ते व त्यांचे कुटुंबिय जेवण करुन झोपी गेले. 

रात्री दोनचे सुमारास घराबाहेर कुत्रे जोरजोरात भुंकत असल्याने जाग येऊन त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, काही संशयास्पद आढळले नाही, आणि त्यावेळी मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी होती. 

त्यानंतर नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता उठून घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांना घराबाहेर मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही, म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना उठवून त्यांच्यासह शोध घेतला, पण मोटरसायकल सापडली नाही.

त्यामुळे चव्हाण यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

बार्शी शहरातून, आत्तापर्यंत बऱ्याच मोटरसायकल चोरीस गेल्या असून पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही. पण सतत होणाऱ्या मोटरसायकलींच्या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)