'शेतकऱ्यांचा आसूड' हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल : उद्धव ठाकरे

Admin
0

https://www.barshivishesh.in
Mahatma Jyotiba Phule's book will definitely be an inspiration: Uddhav Thackeray


बार्शी विशेष : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या दि. १२ सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले यांचे 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक तसेच मुंडासे, घोंडगी आणि काठी भेट दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने महाराष्ट्रात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गेली वीस वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर अतिसंवेदनशील पध्दतीने काम करत आहेत, ते कार्य त्यांच्या हातून अधिक घडावे अशा शुभेच्छा  डॉ. नीलमा गोऱ्हे यांनी यावेळी ठाकरे यांना दिल्या.  

या प्रतिकात्मक भेटी मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ.नीलमताई म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, एकाच वेळी ओला दुष्काळ आणि अपुरा पाणी पुरवठा याच्या कात्रीत सापडलेला शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासाकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष; यावर उपाय म्हणून महात्मा फुल्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड आज परत हातात घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी डॉ.गोऱ्हे यांना चांगल्या प्रकारचे सतत यश मिळावे व हातून समाज हिताचे कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा भावना ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

याप्रसंगी, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, महिला सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, महिला शहरसंघटिका सविता मते, माजी नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, युवासेना सहसचिव शर्मिला येवले आदी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)