बांधकामावरच्या पत्रा शेडमधून साहित्य चोरून नेले

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

The materials stored in the shed on the construction site were stolen


बार्शी विशेष : बांधकामावरील पत्राशेडमध्ये ठेवलेले साहित्य चोरीस गेल्याची घटना कुर्डूवाडी रोड येथे घडली. याबाबतची फिर्याद शामल अमर नलवडे (वय ३७) रा. नलवडे प्लॉट, कुर्डूवाडी रोड, बार्शी यांनी दिली आहे.

कुर्डूवाडी रस्त्यावरील नलवडे प्लॉटमध्ये त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी लागणारे लोखंड, सिमेंट इत्यादी साहित्य त्यांनी बांधकामाच्या जागेतील पत्रा शेडमध्ये ठेवले आहे.

दि. ११ सप्टेंबर रोजी त्या नेहमीप्रमाणे बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या असता, दोन इसम बांधकामावरील लोखंडी साहित्य गोळा करून पोत्यात भरताना त्यांना दिसले. त्यामुळे तुम्ही कोण आहात आणि साहित्य का घेऊन चाललात असे त्यांना विचारले असता, पोत्यात भरलेले लोखंडाचे साहित्य घेऊन ते दोघे पळून गेले. 

त्यावेळी त्यांनी पत्राशेडमध्ये जाऊन पाहिले असता, तेथे ठेवलेल्या साहित्यापैकी अखंड लोखंडी सळया व तुकडे, लोखंडी खोरे, प्लॅस्टिकच्या पाट्या, लोखंडी स्टूल असे साहित्य चोरीस गेल्याचे आढळले.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)