शेतकऱ्यांची थकीत २१ कोटींची रक्कम ही द्यावीच लागेल : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

The outstanding amount of 21 crores of farmers will have to be paid: Collector 

आर्यन शुगर संदर्भातील बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेण्याचा दिला आदेश 


बार्शी विशेष : आर्यन शुगर साखर कारखाना हस्तांतरीत झाला तरी, शासनाचा बोजा हा जमीनीवर व मशिनरीवर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. २१ कोटींची रक्कम ही द्यावीच लागेल, असे थकित एफ.आर.पी. रक्कमेच्या वसुलीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

दि ८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, कारखाना खरेदीदार यांनी कारखाना खरेदी केल्यानंतर, संपूर्ण ६८ कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहेत. साखर संचालक यांचे आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांना एफ.आर.पी. ची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना रक्कम किती दिवसांत शासनाकडे जमा करणार याची विचारणा केली. तसेच कारखाना हस्तांतरीत झाला तरी, शासनाचा बोजा हा जमीनीवर व मशिनरीवर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. २१ कोटींची रक्कम ही द्यावीच लागेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना सदरची रक्कम भरण्याबाबत काय निर्णय होणार व केव्हा जमा करणार याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

सदर बैठकीस आमदार राजेंद्र राऊत, साखर संचालक, जिल्हा उपनिबंधक, सरव्यवस्थापक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, तहसिलदार बार्शी व ॲड. सागर रोडे  उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)