आ. राजेंद्र राऊत यांनी केले तीन पदरी टेंभुर्णी ते कुसळंब रस्त्याचे भूमीपूजन

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

MLA Rajendra Raut laid the Bhoomipujan of three lane Temburni to Kusalamb road

बार्शी विशेष : टेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याचे भूमीपूजन आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पूर्वीच्या दोन पदरी रस्त्याचे रूपांतर करून नव्याने तीन पदरी रस्ता होणार असल्याची माहिती आ. राजेंद्र त्यांनी दिली. ८४ कोटी रुपये खर्चून सदरचे ७३ किलोमीटरचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादच्या संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कामाचे टेंडर घेतलेले असून, दोन वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील दोन ते चार वर्षापासून सदरचे काम रखडले होते, हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. यावेळी गडकरी यांनी लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. 

बार्शी तालुक्याला जोडण्यात येणाऱ्या इतर तालुके व जिल्ह्याचे दळणवळणाच्या रस्त्याचे जाळे, त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील गावांना एकमेकांशी जोडणारे रस्ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी राजेंद्र राऊत हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सतत संपर्कात राहून प्रयत्नशील आहेत. मागील अडीच वर्षांच्या त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी बार्शी शहर व तालुक्यातील रस्त्यांकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत व अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, प्रशांत कथले, विलास आप्पा रेणके, सुभाष शेठ लोढा, विजय नाना राऊत, प्रोजेक्ट मॅनेजर एस.पी. शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)