आमदार राजेंद्र राऊत यांनी साधला शहरातील ब्रह्मवृंदाशी संवाद

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

MLA Rajendra Raut interacted with Brahmabrinda in the city


बार्शी विशेष : येथील श्री भगवंत मंदीरात आ. राजेंद्र राऊत यांनी सोमवार ५ सप्टेंबर रोजी शहरातील ब्रह्मवृंदाशी संवाद साधला. त्यावेळी विजय कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, अनंत कवठाळे, प्रविण शिरसीकर, विजय घुमरे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या मांडल्या. 

राऊत यांनी त्यांच्या मागण्या ऐकल्यानंतर, ब्राह्मण समाजाच्या सभागृहासाठी आमदार निधीतून वीस लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे स्व.काकासाहेब सुलाखे यांचे कर्तृत्व व योगदान याबद्दल त्यांचा गौरव व्हावा म्हणून, बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच एखाद्या इमारतीस त्यांचे नाव देण्यात येईल असे जाहीर केले. त्याचप्रमाणे समाजाचे प्रश्न सोडविण्याची संधी द्यावी अशी विनंती केली.

तसेच दि. सोमवार ५ सप्टेंबर २०२२ रोजी भारताचे पूर्व राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र  अभिवादन करून, शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. ना.पां. देशपांडे, अनंत कवठाळे, अनिल देशपांडे, तुषार महाजन, प्रसाद सहस्त्रबुद्धे, व्यंकटेश कुलकर्णी, विनायक देशपांडे, मुकुंदराज कुलकर्णी या गुरुजनांचा सत्कार आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. 

ब्राह्मण समाजाला सभागृहासाठी धर्माधिकारी प्लॉट येथे विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश धर्माधिकारी यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारत पवार यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात येऊन सत्कार करण्यात आला. 

बार्शी पुरोहित संघाच्यावतीने केलेल्या वेदघोषात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आ. राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. 

सदर बैठकीसाठी ब्राम्हण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रविण शिरसीकर, प्रदेश सदस्य विजय कुलकर्णी, ॲड. संतोष कुलकर्णी, बार्शी तालुकाध्यक्ष कैलास बडवे, कार्याध्यक्ष दिनकर सापनाईकर, मुकुंद कुलकर्णी, मुकुंदराज कुलकर्णी, शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुध्दे, सचिव तुषार गदगी, पांडुरंग कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी निरमावाले, अमित आपटे, अमोल सुलाखे, अमोल कुलकर्णी, प्रसाद शिरसीकर, मंदार कुलकर्णी, राजाभाऊ कुलकर्णी, नितीन देशपांडे, सौ. पद्माताई काळे, पेशवा युवा मंचचे सुर्यकांत देशमुख, सुशिल बडवे व ब्राह्मण महासंघ, पेशवा युवा मंच, पुरोहीत ब्राह्मण संघ, महीला आघाडी ब्राह्मण महासंघ, बार्शी यांचे सर्व पदाधिकारी व बार्शीतील समस्त ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने हजर होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)