माहेरवरुन लाख रुपये आणण्याच्या मागणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
married women suicide after demand of bringing one lakh rupees 

बार्शी विशेष : आठ महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेने गाडी घेण्यासाठी माहेरवरुन पैसे आणण्याच्या सततच्या मागणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात, तिचा भाऊ राहुल मारुती दुर्गे, वय २७ (रा. मुकुटबन, ता. झरी, जि. यवतमाळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, माझी बहिण मीना हिने, ऑनलाईन ओळख झालेल्या रोहित अशोक सूर्यवंशी, (रा. भवानी पेठ, गवत गल्ली, बार्शी) याच्याशी आठ महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. 

त्यानंतर रोहित तिला गाडी घेण्यासाठी माहेरवरुन पैसे घेऊन ये अशी सतत मागणी करुन शिवीगाळी व मारहाण करत होता. त्यामुळे मी त्याला आत्तापर्यंत ३० ते ३५ हजार रुपये ऑनलाईन व बहिण माहेरी आल्यावर काही रक्कम रोख हातात दिली होती. तरीही तो अजून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास देत होता. 

या त्रासाला कंटाळून माझ्या बहिणीने ६ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ती गंभीर असल्याचे फोनवरुन समजल्याने मी घरच्या लोकांसह बार्शीकडे निघालो असता, वाटेतच माझी बहिण मयत झाल्याचे समजले.

तिचा पती रोहित याने पैसे आण नाहीतर जीव दे, असे म्हणून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)