![]() |
| The teacher's motorcycle was stolen until he brought vegetables |
बार्शी विशेष : मंडईतून भाजी घेऊन येईपर्यंत भर दुपारी प्राथमिक शिक्षकाची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना शनिवार दि. १६ जुलै रोजी बार्शी शहरात घडली. याबाबतची फिर्याद परसराम वसंत काळे (वय ४६), रा. कोरेगांव, ता. बार्शी (हल्ली रा. पवार प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) यांनी दिली आहे.
काळे हे नालगांव येथील जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शनिवार बाजार दिवस असल्याने ते दि. १६ जुलै रोजी बार्शी शहरातील भोगेश्वरी मंदिराजवळील मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा मोटरसायकल क्र. एमएच-१३-बीएफ-६९२६ ही अग्निशामक कार्यालयाचे समोरील पिंपळाच्या झाडाखाली हँडल लॉक करुन लावली होती.
अर्ध्या तासाने ते भाजी घेऊन मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता, मोटरसायकल तेथे न दिसल्याने, ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन दिवस सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्यामुळे, यासंदर्भात त्यांनी दि. १८ जुलै रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
