![]() |
| A case has been registered for obstructing traffic |
बार्शी विशेष : सोमवार दि. १८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाचे सुमारास सपोनि उदार, पोउनि कर्णेवाड, सपोफौ ठाकर, पोकॉ वडले व युन्नुस हवालदार यांचे वाहतूक नियमन पथक शहरातून गस्त घालत असताना, गवळे गल्ली येथील खांडवीकर कापड दुकानासमोर एमएच-१४-एचयू-६३७२ क्रमांकाची स्कार्पिओ जीप रस्त्याच्या मध्ये वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने लावलेली दिसून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांचे नांव त्यांनी दत्तात्रय कुंडलिक टाळके (वय ४१), रा. राळेसांगवी, ता. भूम जि. उस्मानाबाद असे सांगितले.
वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल अशा पध्दतीने वाहन उभे केल्याबद्दल पोकॉ युन्नुस हवालदार यांनी त्यांच्याविरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम २८३ नुसार फिर्याद दिली आहे.
