एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे युनियन बँकेचे आवाहन

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Union Bank's appeal for availing OTS Scheme

बार्शी विशेष : बार्शी  तालुक्यातील युनियन बँक ऑफ इंडियाने खातेदारांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे. या योजनेचा थकबाकीदार शेतकरी खातेदारांनी लाभ घेण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

थकबाकीदार शेतकरी खातेदारांसाठी ही योजना असून,सदरील योजना १५ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे.

बार्शी तालुक्यातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला संलग्न असलेल्या गावातील थकबाकीदार, खातेदार शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील थकीत रकमेची एकरकमी कर्ज परतफेड केल्यास त्यांना सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी बँकेच्या या योजनेचा लाभ घ्यावा तसेच या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी बँकेच्या शाखेला भेट द्यावी असे आवाहन बार्शी शाखेचे शाखा व्यवस्थापक सुरज गोडगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)