![]() |
| The jeep parked in front of the house caught fire overnight; Incidents in Barshi |
बार्शी : घरासमोर लावलेल्या जीपला अज्ञात व्यक्तिने आग लाऊन दिल्यामुळे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबतची फिर्याद इम्रान सलीम मुल्ला (वय ३५), रा. बारंगुळे प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी यांनी दिली आहे. त्यांनी त्यांच्या मावस भावाची कमांडर जीप क्र. एमएच-१३-एन-१४९७ ही घरगुती वापरासाठी घेतली होती.
दि. ७ जूनचे रात्री सदरील जीप घरासमोर लाऊन ते झोपी गेले. रात्री एक वाजणेचे सुमारास कसला तरी आवाज आल्याने त्यांची आई उठली व दरवाजा उघडून पाहिले असता घरासमोर लावलेल्या जीपला आग लागलेली दिसली. तेव्हा तिने फिर्यादीस उठविले. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांच्या मदतीने सदर आग विझविली. या आगीत जीपचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तिविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
