बाहेरगावी गेल्यावर घरातील २ लाख ४० हजार किंमतीचा ऐवज गेला चोरीला

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
After going out of town, the house was looted worth Rs 2 lakh 40 thousand

बार्शी : सासऱ्याच्या तेराव्यास जाताना नजरचुकीने मागील दरवाजा बंद करण्याचे विसरल्याने घरातील २ लाख ४० हजार किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली.

शरद शिवाजी देशमुख (वय ५१) रा. पिंपळगांव (दे), ता. बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दि. १३ मे रोजी सासऱ्याच्या तेराव्याचा कार्यक्रम ऐकुरका, ता. कळंब येथे असल्याने ते दुपारी १२ ते ५ या वेळेत तिकडे गेले होते. संध्याकाळी तेथून परत आल्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले ९० हजार किंमतीचे ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दीड लाख रुपये दिसून आली नाही.

ते घरातील लोकांनी व नातेवाईकांनी घेतले असतील किंवा कुठेतरी ठेवले असतील असा समज झाल्याने व ते परत देतील असे वाटल्याने त्यांनी आजपर्यंत तक्रार दिली नव्हती.

दि. ९ जून रोजी त्यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. १८६० कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)