बार्शी टपाल कार्यालयात ८ वर्षापूर्वी अपहार झाल्याची तक्रार दाखल

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Filed a complaint of embezzlement at Barshi Post Office 8 years ago

बार्शी : येथील टपाल कार्यालयातील तत्कालीन डाक सहाय्यक, बाळासाहेब विष्णू लोखंडे यांनी दि. १० डिसेंबर २०१३ ते १२ सप्टेंबर २०१४ या कालावधीत प्रत्येकी ३७९० रुपये किंमतीचे २ सीओडी पार्सलची नोंद पार्सल नोंदवहीत न करता, सूचनापत्र पोस्टमनकडून पत्ताधारकांस दिले. त्या पत्ताधारकांनी ती पार्सले रक्कम देऊन सोडविली.

ते ७५८० रुपये सरकार जमा न करता, बाळासाहेब लोखंडे यांनी वैयक्तिक कारणांसाठी वापरुन सरकारी रकमेचा अपहार केला, तसेच सदरची पार्सले वाटप केल्याची सूचनापत्रे व कार्यालयीन नोंदी लोखंडे यांनी नष्ट केल्या.

अशी फिर्याद राहुल विनायक जाधव (वय ३२) उपविभागीय डाक निरिक्षक, बार्शी उपविभाग यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)