![]() |
| beatup using sattur for asking for money; Incident at Mungshi |
बार्शी : उसने दिलेले पैसे परत मागितल्यावरुन सत्तूर व लोखंडी मेकचा वापर करत मारहाण केल्याची घटना मुंगशी येथे घडली.
याबाबतची फिर्याद उमेश शिवाजी क्षिरसागर (वय ५५), रा. वैराग, ता. बार्शी यांनी दिली आहे. दि. २६ मे रोजी सकाळी सव्वाआठचे सुमारास ते त्यांची दोन मुले व पुतण्यासह शेतात ऊसाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांच्या शेताजवळ राहण्यास असलेले जयसिंग हरिदास क्षिरसागर, हरिदास त्र्यंबक क्षिरसागर, दत्तात्रय हरिदास क्षिरसागर (सर्व रा. मुंगशी, ता. बार्शी) यांनी शेतजमीन घेण्यासाठी पूर्वी त्यांच्याकडून उसने घेतलेले पैसे परत मागितले असता, त्यांनी पैसे परत देणार नाही म्हणत शिवीगाळी व दमदाटी करुन जयसिंग याने सत्तूरने मुलगा आशिष यांस मनगटावर व पुतण्या विनोद यांस दंडावर मारून जखमी केले. दत्तात्रय याने दुसरा मुलगा शुभम यांस लोखंडी मेकने पाठीत मारुन जखमी केले. हरिदासने पाठीत मारुन त्यांना स्वतःला जखमी केले. बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार घेऊन दि. ८ जून रोजी त्यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
