बार्शी शहरातून १२ वी मोटरसायकल चोरीला

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
12th motorcycle stolen from Barshi city

बार्शी : येथील कुंकूलोळ प्रशालेत शिक्षक असलेले संतोष नरेंद्र खुडे (वय ४४) रा. आझाद चौक, बार्शी यांना त्यांचे मित्र नागनाथ महादेव व्हटकर, रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र. एमएच-१३-सीपी-०१०८ ते नोकरीसाठी पुणे येथे गेल्यामुळे मागील चार वर्षापासून खुडे यांना वापरण्यासाठी दिली होती.

सदर मोटरसायकल दि. १० जून रोजी रात्री नऊचे सुमारास घरासमोर हँडल लॉक लाऊन खुडे झोपी गेले. सकाळी साडेपाचचे सुमारास ते नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी उठून बाहेर आले असता, त्यांना घरासमोर लावलेली मोटरसायकल दिसून आली नाही.

त्यांनी घरात येऊन गाडीची चावी कुणाला दिली आहे का याची चौकशी केली, परंतु कोणासही चावी दिली नसल्याचे कुटुंबियांनी त्यांना सांगितले. आजूबाजूस शोध घेऊनही गाडी न सापडल्याने त्यांनी दि. १४ जून रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे.

एक डझन मोटरसायकल गेल्या चोरीला

बार्शी शहरातून दि. १ फेब्रुवारी २०२२ पासून चोरीस गेलेली ही १२ वी मोटरसायकल आहे. यामुळे बार्शी शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकींनी आता एक डझनचा आकडा गाठला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)