![]() |
| Department of Agriculture orders ban on sale of seeds at Vairag including Barshi |
बार्शी : खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली असून शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र कांबळे (उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डूवाडी), शहाजी कदम (तालुका कृषी अधिकारी, बार्शी) यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.
विक्री बंद आदेश दिलेल्या दुकानांची नावे,
श्री सोनार महाराज कृषी केंद्र, गावसाने ऍग्रो एजन्सी, संघवी अग्रो एजन्सी, भुमकर, समर्थ कृषी केंद्र, बालाजी कृषी केंद्र, समृद्धी कृषी केंद्र, (सर्व वैराग)
भगवंत कृषी एजन्सी, बार्शी व जगनाडे ऍग्रो एजन्सी, बार्शी
अशी असून, या कृषी सेवा केंद्रातील महाबीज, निर्मल सीडस्, स्वयंम् सीडस्, कल्पवृक्ष सीडस् , दिव्य सीडस्, संजय सीडस्, सागर सीड, यशोदा सीडस्, नोव्हा गोल्ड सिड, व्हिगोर बायोटेक, हरित क्रांती सीड, रायझिंग सन सीड, पंचगंगा सीड, ओम साई सीड, सिद्ध सीड, विनय सीडस्, वसंत रूप सीड या कंपन्यांचे ६५७ क्विंटल सोयाबीन बियाणे, ३३ क्विंटल तूर बियाणे, ५३ क्विंटल उडीद बियाणे, ४ क्विंटल मका बियाणे, २ क्विंटल मूग बियाणे इत्यादी विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विक्री करताना दुकानदाराकडे खरेदीची बिले नसणे, लिंक बिले नसणे, स्टेटमेंट १ व २ नसणे, प्रमाणित बियाण्याचे रिलीज ऑर्डर नसणे, विक्री परवाना यामध्ये कंपनीचा समावेश नसणे, खरेदी रजिस्टर साठा व विक्री रजिस्टर अपूर्ण असणे इत्यादी कारणे आहेत.
या कारवाई प्रसंगी प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळचे कृषी पर्यवेक्षक एन. बी. जगताप, संजय कराळे, भारत महांगडे, रघुनाथ कादे, अण्णा नलवडे आदी उपस्थित होते.
