नोटा खाली पडल्याचे सांगून बार्शीतील सेंट्रल बँकेबाहेरुन ५० हजार रुपये केले लंपास

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
50 thousand stolen from outside the central bank in Barshi saying the note had fallen down

बार्शी : नोटा खाली पडल्याचे सांगत, बार्शीतील सेंट्रल बँकेबाहेरुन वृध्दाचे ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना दि. १५ जून रोजी घडली.

बजरंग नवनाथ जाधव (वय ७०) रा. राऊळ गल्ली, बार्शी असे या वृध्दाचे नांव आहे. ते गाडीवर गोळ्या बिस्किट विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतात.

दि. १५ जून रोजी सकाळी साडेअकराचे सुमारास तेलगिरणी चौकात मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची मोटरसायकल बँकेच्या बाहेर उभी केली होती.

दुपारी साडेबाराच्या सुमारास बँकेतून मुदत ठेवीवर कर्जाने घेतलेली ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेची दीड लाख रुपयांची मुदत ठेवीची पावती, केळकर पतसंस्थेचे पासबूक अशी रोख रक्कम व कागदपत्रे असलेली कागदी पिशवी त्यांनी बाहेर आल्यानंतर मोटरसायकलच्या हुकाला अडकवली आणि ते मोटरसायकल घेऊन बँकेच्या गेटबाहेर आले.

तेव्हा समोरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांच्या दंडाला धक्का देऊन तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी गेटच्या आत येऊन पाहिले असता, त्यांना शंभरची एक नोट व वीस रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या. ती संधी साधून त्या दोन इसमांनी मोटरसायकलला लावलेली पिशवी लंपास केली.

जेव्हा जाधव त्या नोटा घेऊन मोटरसायकलकडे आले, तेव्हा त्यांना हुकाला अडकवलेली कागदी पिशवी दिसली नाही. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)