अल्पवयीन मुलीस पळवून नेले

Admin
0



कारी, ता. बार्शी येथील माध्यमिक शाळेत इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी पांगरी पोलीसांत दिली आहे.

नेहमीप्रमाणे दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेत गेलेली ही मुलगी शाळा सुटल्यानंतरही घरी न आल्याने पालकांनी तिचा शोध आजूबाजूस तसेच नातेवाईकांकडे  घेतला. तरीही तिचा शोध न लागल्याने पालकांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)