बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणेबाबत उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांना ईमेलने पत्र पाठवून, सर्व शेतकऱ्यांचे वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा मोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला आहे.
उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांना लिहलेल्या पत्रात, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून, तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश करण्याची विनंती आ. राजेंद्र राऊत यांनी केली आहे.