बार्शी विशेष : विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या युवकास बार्शी शहर पोलिसांनी सोलापूर रोडवरील राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसरातून ताब्यात घेतले. रोहित संतोष मारकड (वय २१) रा. चोरमुले प्लॉट, बार्शी (मूळ रा. उपळाई, ता. कळंब, जि. धाराशिव) असे त्याचे नाव असून, अंगझडतीमध्ये त्याचेकडे जिवंत काडतूसासह एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम ३,२५ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.
१३ फेब्रुवारी रोजी दुपारी चारचे सुमारास ही कारवाई पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
