मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले; भर दिवसा मोटरसायकलची चोरी

Admin
0



पुन्हा एकदा बार्शी शहरातून मोटरसायकलची चोरीस जाण्याची घटना घडली आहे.

पिंटु संदीपान रामगुडे, (वय ३९) रा.शिंदे प्लॉट उपळाई रोड, बार्शी यांचे उपळाई रोड येथे जय मल्हार कुशन नांवाचे दुकान आहे. 

दि. २ मार्च २०२२ रोजी दुपारी तीन ते साडेचारचे दरम्यान नेहमीप्रमाणे उपळाई रोड येथील कुशन दुकानाचे शेजारी त्यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटरसायकल क्र.MH-13 AV-7305 ही हॅन्डल लॉक करुन लावली होती.

त्यानंतर दुकानातील काम आटोपून दीड तासाने बाहेर आल्यानंतर त्यांना मोटरसायकल दिसून आली नाही. त्यामुळे आजूबाजूला चौकशी करुन व शोध घेऊनही ती न सापडल्याने ती चोरीस गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)