सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची बार्शीत आत्महत्या

Admin
0



प्रिती स्वप्नील देवराम (वय २४) या नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

प्रितीचे लग्न दि. २९ जानेवारी २०२२ रोजी झाले होते, तेव्हापासून लग्नात योग्य मानपान केला नाही, हुंडा कमी दिला, बांधकामासाठी वडिलांकडून पांच लाख रुपये घेऊन ये असा मानसिक छळ तिच्या सासरच्या लोकांनी सुरु केला. तसेच पती स्वप्नील संभाजी देवराम हा तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. 

हा मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने दि. ३ मार्च २०२२ रोजी  बार्शी येथील तिची नणंद ज्योती महेश गोरे, रा. अलीपूर रोड, बार्शी हिचे घरातील बाथरुम शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात आत्महत्या केली. तिचा घातपात केला असावा असा आमचा संशय आहे, अशी फिर्याद तिचा भाऊ अमृत उर्फ अमित गोकुळ नन्नवरे (वय २८) हल्ली रा. चिखली, पुणे याने तिचा पती, सासू, नणंद यांच्याविरुध्द बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)