भाजीला हात का लावला या कारणावरुन मारहाण

Admin
0

https://www.barshivishesh.in/
Beating up for the reasons of why touched the vegetable

भाजीला हात का लावला या कारणावरुन मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील घारी गावात घडली.

मंगळवार दि. २२ मार्च रोजी घारी गावात बाजार भरलेला असताना, तेथे  गावातील अक्षय लक्ष्मण भंडारे हा मेथीची भाजी विक्रीसाठी घेवून बसलेला होता. 

तेव्हा गावातील सखूबाई हरिदास गिड्डे (वय ६८) या त्याचेकडील भाजीची पेंडी हातात घेऊन पहात असता, अक्षयने तू माझ्या भाजीला हात का लावलास असे म्हणून शिवीगाळ केली. ही गोष्ट सखूबाईने घरी येऊन सांगितली. 

तेव्हा त्यांचा मुलगा रामलिंग याने अक्षय भंडारे याचा चुलत चुलता शिवदास भंडारे यांना अक्षयने आईला शिव्या दिल्या आहेत तुम्ही त्याला समजावून सांगा असे बोलत असता, तेथे भांडण लागले आहे का हे पाहण्यासाठी सखूबाई व त्यांचे पती हरिदास तेथे  गेले. त्यावेळी राजेश भंडारे व अक्षय भंडारे (दोघे रा. घारी) यांनी त्यांना दगडाने व काठीने उजवे हातावर ,पाठीत मारहाण करून मुक्का मार दिला. अशी फिर्याद पांगरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)