नवनिर्मिती फाऊंडेशन रत्नागिरीचा पुरस्कार राहुल भड यांना जाहीर

Admin
0

 

https://www.barshivishesh.in/
Navnirmiti Foundation Ratnagiri award announced to Rahul Bhad

गौडगांव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांना नवनिर्मिती फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे.

राहुल भड हे मागील १७ वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राकरिता सक्रिय सेवा करत आहेत. शिवाय त्यांनी सहारा वृद्धाश्रम सुरु केला असून, तेथे दाखल होणाऱ्या वृद्धांकरिता अन्न, वस्त्र, निवारा तसेच आरोग्य सुविधा या माध्यमांतून मोफत उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नवनिर्मिती फाउंडेशन यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.

यापूर्वी त्यांना परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, गुणीजन रत्नगौरव पुरस्कार, राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार, प्रतिभा संग्राम पंढरी गौरव पुरस्कार, ग्राहक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार, स्व. जयवंत (दादा) काटमोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार, जिविका फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार, मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने वृद्धसेवा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)