महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून बार्शीत महिला कामगारांचा गौरव

Admin
0

 

Women workers felicitation at Ashwini Cancer Hospital Barshi by Maharashtra Labour Welfare Board
अश्विनी कॅन्सर हॉस्पिटलमधील महिला कामगारांचा उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल गौरव 

बार्शी विशेष : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सातत्याने विविध उपक्रम व आर्थिक योजना राबवत असते. याचाच एक भाग म्हणून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बार्शी येथील अश्विनी कॅन्सर हॉस्पिटलमधील महिला कामगारांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.


कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी याप्रसंगी कुर्डुवाडी येथील प्रसिद्ध डॉ. जयंत करंदीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. "मानवता हाच खरा धर्म असून रुग्णाची सेवा हीच ईश्वर सेवा समजावी. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे," असे आवाहन डॉ. करंदीकर यांनी यावेळी केले. तसेच उपस्थितांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


या कार्यक्रमाला हिंगमिरे कॅन्सर प्रोजेक्ट हेड डॉ. संपदा कुलकर्णी आणि रोहित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. नेने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


सदर कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हा कामगार अधिकारी समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी केंद्राचे संचालक बाळासाहेब आंधळकर यांनी राहुल ओहळ, गायत्री पाटील व उमा तांबे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)