बार्शीत शिवजयंती उत्सवात नियमांचे उल्लंघन; प्रतिष्ठानच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

0

Violation of Rules during Shiv Jayanti in Barshi; Case Filed Against President of Pratishthan
 Violation of Rules during Shiv Jayanti in Barshi; Case Filed Against President of Pratishthan


बार्शी विशेष : शहरातील बारंगुळे प्लॉट परिसरात शिवजयंती उत्सवादरम्यान प्रशासकीय नियमांचे उल्लंघन (Rules Violation) केल्याप्रकरणी जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय स्वामी यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


१८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) नुसार जमावबंदीचा आदेश लागू असतानाही, २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता लहान मुलांच्या नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात विनापरवाना साउंड सिस्टिमचा (Sound System) वापर करून गर्दी जमवण्यात आली होती. 


पोलीस प्रशासनाने केवळ १९ ते २१ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठीच शिवजयंती कार्यक्रमाची परवानगी दिली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोकॉ कादर तांबोळी यांच्या फिर्यादीवरून स्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ (Maharashtra Police Act Section 135) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)