आगळगांव आणि पांगरीत ७ मार्चला 'समाधान शिबीर'; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Admin
0

 

बार्शी समाधान शिबीर अभियान २०२६ - महसूल विभाग सेवा
Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Shibir' organized in Barshi Taluka 

बार्शी विशेष : महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी बार्शी तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. 


या अभियानांतर्गत शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी आगळगांव आणि पांगरी मंडळ स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा थेट लाभ घेता येईल. ग्रामीण भागातील जनता, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून याचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, आणि उत्पन्न, जातीचे तसेच रहिवासी दाखल्यांचे तात्काळ वितरण केले जाणार आहे. याशिवाय ई-मोजणी, पी.एम. किसान योजना, ॲग्रीस्टॅक आणि नागरी सुविधांच्या 'एक खिडकी' प्रणालीद्वारे तक्रार निवारणाचे कामही करण्यात येईल. भूसंपादन आणि अकृषक परवान्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची सुविधाही येथे उपलब्ध असेल. 


आगळगांव आणि पांगरी मंडळातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रशासकीय कामे मार्गी लावावीत, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)