प्रार्थनास्थळांवरील २२ भोंगे उतरवले; बार्शी पोलिसांची मोहिम

0

Major operation by Barshi Police: City freed from unauthorized loudspeakers
 Major operation by Barshi Police: City freed from unauthorized loudspeakers


बार्शी विशेष : सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी बार्शी शहर पोलिसांनी आज शहरात विशेष मोहीम राबवून विविध प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले. या कारवाईमुळे बार्शी शहर आता 'भोंगे मुक्त' झाले असून, पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


काही दिवसांपूर्वी शहरात उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व धर्मीय प्रतिनिधींना सूचना देऊन अनधिकृत भोंगे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, आज २८ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आपल्या ताफ्यासह शहरात धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेत एकूण ११ मशिदींची तपासणी करण्यात आली असून, ८ मशिदींवरील १४ भोंगे आणि ५ मंदिरांवरील ८ भोंगे असे एकूण २२ अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत.


ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्यासह सपोनि समीर ढोरे, पोसई महेश गळगटे, मपोसई सोनम जगताप, एएसआय अजित वरपे आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)