विनापरवाना पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणास बार्शीत अटक

Admin
0

 

Man arrested for carrying a pistol in Barshi city

Man arrested for carrying a pistol in Barshi city


बार्शी विशेष : कंबरेला विनापरवाना पिस्टल लावून बार्शी शहरात फिरणाऱ्या एका तरुणास शहर पोलिसांनी अटक केली. त्याचेकडून एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. ऋषीकेश रमेश क्षीरसागर (वय २४) रा. रामहरीनगर, भूम, जि. धाराशिव असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ६ नोव्हेंबरच्या पहाटे ६.२० चे सुमारास तेलगिरणी चौकात ही कारवाई करण्यात आली. 

याबाबत माहिती अशी की, बार्शी पोलिस ठाण्यापासून नजिकच असलेल्या तेलगिरणी चौक येथे एक तरुण कंबरेला पिस्टल लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक तरुण तेथे संशयास्पदरित्या थांबलेला दिसला. पोलिस येत असलेले पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांना त्याला जागीच पकडले.

पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याचेकडे ४० हजार रुपये किंमतीचे मुठीवर दोन्ही बाजूस तपकीरी रंगाच्या पट्टीमध्ये लाल रंगाचे स्टार चिन्ह, तसेच बॅरेलवरील बाजूस इंग्रजीमध्ये USA लिहलेले व डाव्या बाजूस USA ARMY लिहलेले मॅगेझीनसह एक गावठी बनावटीचे पिस्टल, तसेच मागील रिमवर KF7.65 कोरलेले पितळी धातूचे दोन जिवंत राऊंड आढळून आले. त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगण्याचा परवाना नसल्याचे पोलिसांना चौकशीतून समजले. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पोकॉ मोहन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ व २५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.

ही कारवाई पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली, उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर, सपोनि अजित वरपे, हेकॉ घाडगे, डबडे, पोकॉ अनंत व्हनकळस, मोहन कदम, अंकुश जाधव, सचिन नीतनात, धनराज फत्तेपुरे, संगप्पा मुळे, प्रल्हाद आकुलवार यांनी केली.

आचारसंहिता सुरु असताना विधानसभा निवडणूकीच्या ऐन धामधुमीत घडलेल्या या खळबळजनक प्रकारामुळे नागरिकांतून याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)