बार्शी विशेष : घरफोडी करुन ४ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस २४ तासात पकडण्यात बार्शी पोलिसांना यश आले.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ५ चे दरम्यान राहत्या बंद घराचा लाकडी दरवाजा उचकटून घरातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तु, एक एलईडी टिव्ही आणि रोख १५ हजार रूपये चोरून नेल्याची फिर्याद प्रविण शिवशंकर थळकरी, रा. बुरुड गल्ली, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली होती.
याबाबत पोनि बालाजी कुकडे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीचा शोध घेऊन रेकॉर्डवरील आरोपी नागेश राजू बगाडे रा. बार्शी यांस ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
त्यास अटक करुन त्याचेकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, एक एलईडी टिव्ही आणि रोख १४ हजार रुपये असा ४ लाख २९ हजार २५० रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला. त्याचे विरोधात बार्शीसह मुंबई, पुणे येथील पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.
ही कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, पोनि. बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ श्रीमंत खराडे, अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, पोना संगाप्पा मुळे, पोकॉ अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे यांनी केली.