निवडणूक कर्तव्यास नकार; दोन लोकसेवकांविरोधात बार्शीत गुन्हा दाखल

Admin
0

Denial of election duty;  A case has been registered against two public servants in Barshi
Denial of election duty; A case has been registered against two public servants in Barshi

बार्शी विशेष : बार्शी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे निवडणूकीच्या कर्तव्यास जाणेकरीता टाळाटाळ केली म्हणून दोन लोकसेवकाविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


प्रकाश शामराव पाटील, सांगोला महाविद्यालय, सांगोला व वैभव शशीकांत रिसवाडकर, SMSMP ITR, शंकर नगर ता. माळशिरस, जि. सोलापूर अशी या लोकसेवकांची नावे आहेत. 

सदर लोकसेवकांना २४६ बार्शी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी PRO म्हणून नियुक्ती करण्यात येवून त्यांना ८ व ९ नोव्हेंबर २०२४ रोजी द्वितीय प्रक्षिशणास उपस्थित राहणेबाबत आदेशीत केले होते. परंतू सदर कर्मचारी प्रक्षिशणास गैरहजर राहीले. तसेच त्यांना दिलेल्या अंतिम कारणे दाखवा नोटीसीवर त्यांनी मुदतीत कोणताही लेखी अथवा तोंडी खुलासा सादर केला नाही.

१५ नोव्हेंबर रोजी प्रकाश शामराव पाटील यांना संपर्क केला असता, काम करण्यास तयार नसल्याचे सांगीतले, तसेच वैभव शशीकांत रिसवाडकर यांचा फोन बंद असून त्यांनी कोणताही लेखी अथवा तोंडी खुलासा सादर केला नाही. 

त्यामुळे सदर कर्मचाऱ्याविरोधात बी.एन. एस. २०२३ कलम २२३ सह लोकप्रतिनीधीत्व अधिनीयम १९५१ कलम १३४ अन्वये कायदेशीर फिर्याद असल्याचे बार्शीचे निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)