रिक्षात गॅस भरणाऱ्या ठिकाणावर बार्शी पोलिसांचे छापे; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Admin
0

 

Barshi police raids on rickshaw gas filling stations; sixty thousand worth of valuables seized

Barshi police raids on rickshaw gas filling stations; sixty thousand worth of valuables seized


बार्शी विशेष : घरगुती सिलेंडरमधील गॅस रिक्षात भरुन देण्याऱ्या तीन ठिकाणावर बार्शी शहर पोलिसांनी छापे टाकून १८ सिलेंडरसह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


बार्शी शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षामध्ये इंधन म्हणून घरगुती सिलेंडरमधून गॅस भरुन दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी सतीश जोशी यांना बोलावून घेऊन शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी साडेतीन ते सहाच्या दरम्यान शहर पोलिसांनी सदर ठिकाणवर छापे टाकण्याची कारवाई केली. 


बार्शी शहरातील खुरपे बोळ येथील पत्रा शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात १० सिलेंडर, वजन काटा व गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटर, आशा टॉकीज रोडवर टाकलेल्या छाप्यात १ सिलेंडर, वजन काटा व गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटर, शिवप्रभा पतसंस्थेमागे खुरपे बोळ येथे टाकलेल्या छाप्यात ७ सिलेंडर, वजन काटा व गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटर, असे मिळून एकूण १८ घरगुती गॅस सिलेंडर व गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह साठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


याप्रकरणी पो.कॉ. अंकुश जाधव, रविकांत लगदिवे व ज्ञानेश्वर घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक शंकर होनराव (वय ४०), रिहानर रफिक मुजावर (वय १८) व निलेश रामदास ढोणे (वय ३२) (सर्व रा. बार्शी) या तिघांविरुध्द पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३), ( कलम ७) व भादंवि १८६० कलम ३३६ अनुसार गुन्हे दाखल केले आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)