जिओ मोबाईल टॉवरमधील राऊटर गेला चोरीला | Theft of 5G router from Jio mobile tower in Barshi

Admin
0

Theft of 5G router from Jio mobile tower in Barshi

बार्शी विशेष : जिओ कंपनीच्या अलीपूर रस्ता येथे असलेल्या मोबाईल टॉवरमधील 5 जी राऊटर चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली आहे.

सदर टॉवरची देखभाल करणारे तंत्रज्ञ आनंद बिभीषण कांबळे (वय ३२) रा. पाटील प्लॉट, बार्शी यांनी याबाबत तक्रार दिली असून, दि. २८ ऑक्टोबर २०२३ च्या सायंकाळी ७.३० पूर्वी क्रांतीसिंह नगर, अलीपूर रस्ता, बार्शी येथे असलेल्या रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील 5 जी राऊटर कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  


या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)