बार्शी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळून दुचाकीची चोरी

Admin
0

 

The theft of a two-wheeler from near the entrance of Barshi Municipal Council

बार्शी विशेष : बार्शी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली दुचाकी चोराने पळविल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. महादेव बळीराम चिकणे (वय ५०) रा. देशमुख प्लॉट, बार्शी यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 


आ. राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी पुतळ्याजवळ आयोजित केलेल्या सभेस उपस्थित राहण्यासाठी मी आलो होतो, त्यावेळी मी माझी स्पेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच-१३-एएल-४५११) बार्शी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ हँडल लॉक करुन उभी केली होती. सभा संपल्यानंतर मी परत मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आलो असता, ती तेथे दिसून आली नाही, तसेच आजूबाजूस शोध घेऊनही सापडली नाही, यावरुन  कुणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरुन नेल्याची माझी खात्री पटली, असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १० च्या दरम्यान घडली. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)