A girl studying in a college in Barshi is missing
बार्शी विशेष : बार्शीतील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
बार्शी तालुक्यात राहणारी ही मुलगी दररोज बसने येऊन बार्शीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तिचे आई वडिल शेती करतात. दि. २५ नोव्हेंबर रोजी, आज तू शाळेत जाऊ नको असे या मुलीला सकाळी शेतात जाण्यापूर्वी तिच्या आईने सांगितले होते. त्यानंतर तिचे आई वडिल शेतात निघून गेले.
दुपारी घरी आल्यानंतर त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे घरात शोध घेतला असता, शाळेचे दफ्तर आणि घरातील वीस हजार रुपये घेऊन गेल्याचे दिसून आले. तिच्या पालकांनी बार्शीतील महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता, तेथील मुलींनी तिला शाळेत पाहिले होते असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले असावे असा संशय व्यक्त करुन पालकांनी बार्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
