दोन चंदन तस्करांकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; बार्शी शहर पोलिसांची कारवाई

Admin
0

 

13 lakh worth of goods seized from two sandalwood smugglers; Barshi city police action

बार्शी विशेष : चंदन तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बार्शी शहर पोलिसांनी अटक करुन, त्यांचेकडून सुमारे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे २ लाख रुपये किंमतीचे चंदन व ११ लाख रुपये किंमतीच्या वाहनाचा समावेश आहे.

दि. १० मार्च २०२३ च्या रात्री ११ चे सुमारास बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील पोस्ट चौकातून जात असलेला टेंपो (क्र.एमएच-४५-एएफ-१३४१) थांबवून शहर पोलिसांनी तपासणी केली असता, सदर वाहनातून २१ प्लॅस्टिक गोण्यामध्ये भरलेले २६३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे १ लाख ९७ हजार २०० रुपये किंमतीचे ओले सुगंधी चंदनाचे लहान-मोठे लांबीचे तसेच बारीक केलेले तासलेले लाकडाचे तुकडे गैरमार्गाने चोरुन विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करुन परवेज बशीर सय्यद (वय ४४), रा. अन्वर कॉलनी, कागेकोडमेगे, ता. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक व नितिन गोरख राऊत (वय ४३) रा. सर्जापूर तालुका बार्शी या दोघांना अटक केली आहे. याठिकाणी पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली.

पोशि अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि तोरडमल करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)