बार्शी विशेष : स्कूटीला चावी तशीच ठेवून बेकरीत खरेदीला जाताच, अर्ध्या तासातच स्कूटी चोरीला गेल्याची घटना बार्शी शहरात घडली. आदित्य भानुदास घोसले (वय २०) रा. मांगडे चाळ, तुळजापूर रोड, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
दि. २ मार्च रोजी रात्री साडेसात वाजता भवानी पेठेतील कॉम्प्लेक्सच्या समोर चावी एक्टीव्हा स्कूटीला (क्र. एमएच-१३-ईबी-६३२४) तशीच ठेवून, शेजारीच असलेल्या बेकरीमध्ये खरेदीस गेले. सुमारे अर्ध्या तासात खरेदी आटोपून रात्री आठचे सुमारास परत स्कूटी लावलेल्या ठिकाणी येऊन पाहिले असता, स्कूटी तिथे दिसून आली नाही, तसेच सगळीकडे शोध घेऊनही सापडली नाही.
