बार्शी विशेष : तेलगिरणी चौकातील एका फायनान्सचे गेटसमोर लावलेली मोटरसायकल भरदिवसा चोरीस गेली. संतोष शिवाजी भुईटे (वय ३६) रा. पाटील चाळ, तुळजापूर रोड, बार्शी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
स्नेहश्री मल्टीस्टेट या बँकेत काम करणारे संतोष शिवाजी भुईटे यांनी, दि. २२ फेब्रुवारी रोजी बँकेत कामास जाताना, तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स येथील आयएफएल फायनान्सचे गेटसमोर हँडल लॉक करून लावलेली मोटरसायकल (क्र. एमएच-१३-एटी-०३७२) सकाळी १० ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान चोरीस गेली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सपोनि सुधीर तोरडमल करत आहेत.
