![]() |
बार्शी विशेष : ऊस भरुन साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.
प्रकाश श्रीमंत मगर (रा. राखेल, ता. तुळजापूर) यांच्या ट्रॅक्टरवर चालकाचे काम करणारे अमोल तानाजी चव्हाण (वय २३) रा. कासारी, ता. बार्शी हे दि. २४ डिसेंबर रोजी तांबेवाडी, ता. बार्शी येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरुन उपळे (दु) मार्गे कंचेश्वर साखर कारखान्याकडे निघाले होते.
त्यावेळी रात्री ८ चे सुमारास उपळे दुमाला येथे तुळजापूर रस्त्याने जाताना, ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल समोरील चढ चढत असताना समोरुन अचानक वेगाने आलेल्या अशोक लेलँड ट्रकने ट्रॅक्टरला उजव्या बाजूने धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले अशी तक्रार अमोल चव्हाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
