बिल न देता परमिट रुम मॅनेजरच्याच खिशातून पैसे काढून घेतले; वैरागमधील घटना

Admin
0

https://www.barshivishesh.in
took money from the hotel manager's pocket without paying the bill; Incidents in Vairag


बार्शी विशेष (वैराग) : मद्यपान केल्यानंतर बिल न देता उठून जाणाऱ्या ग्राहकांना पैसे मागितल्यामुळे परमिट रुम मॅनेजरला धमकी देत त्याच्याच खिशातील दीड हजार रुपये काढून घेतल्याची घटना वैराग येथे घडली. 

याबाबत संतोष बालाजी रमपुरे (वय ४५) रा. वैराग यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वैराग येथील प्रितम हॉटेल बार व परमिट रुममध्ये रमपुरे मागील बारा वर्षापासून मॅनेजर म्हणून काम पहातात. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी हॉटेलध्ये तीन लोक आले, त्यापैकी त्यांच्या ओळखीचा अजय काळे हा एक होता. 

मद्यपान करुन झालेले ३७५ रुपये बिल न देताच  ते तिघे उठून हॉटेलबाहेर जाऊ लागल्यामुळे रमपुरेंनी त्यांच्या मागे जाऊन बिल मागितले. तेव्हा अजय काळेने तू मला ओळखत नाही, मी वैरागमधील मोठा बदमाष आहे, वैरागमध्ये मला कोणत्याही हॉटेलमध्ये दारु, जेवणाचे पैसे मागत नाहीत असे उत्तर दिले. 

त्यावर बिल दिले नाही तर मालक माझ्या पगारातून कपात करतील असे रमपुरेंनी सांगूनही अजय काळेने बिल देणार नाही म्हणाल्यामुळे मी पोलिसांना फोन करतो असे रमपुरे म्हणताच, अजय काळेने आपल्याकडे पैसे नाहीत, आता जेवण करायचे आहे म्हणत काळेच्या साथीदारांनी रमपुरेचे हात धरले व काळेने एका हातात खालचा दगड उचलून भिती दाखवत दुसऱ्या हाताने त्यांच्या पँटच्या खिशातील ५०० रुपयांच्या तीन नोटा जबरदस्तीने काढून घेतल्या, आणि पोलिसांना फोन केला तर तुला सोडणार नाही असे धमकावले. आवाज ऐकून हॉटेलमधील कामगार बाहेर येत असल्याचे बघून ते तिघे पळून गेले. ही घटना दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली.

वैराग पोलिस ठाण्यात अजय काळे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३४, ३९२, ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)