शासकीय योजनेच्या लाभाचे आमिष दाखवून वृध्द महिलेस फसविणाऱ्या महिलेला अटक

Admin
0
https://www.barshivishesh.in
A woman was arrested for cheating an elderly woman with the lure of profit


१ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; बार्शी शहर पोलीसांची कामगिरी

बार्शी विशेष : विधवा स्त्रियांना सरकार ४० हजार रुपये देत आहे असे आमिष दाखवून मथुराबाई हरीभाऊ मिरजकर, (रा. बारंगुळे गल्‍ली, कसबा पेठ, बार्शी) या ८२ वर्षीय वृध्द महिलेच्या हातातील ४ तोळे वजनाच्या दोन पाटल्या काढून त्यांना हातचलाखीने खोट्या पाटल्या देऊन फसवणूक केल्याची घटना दि. १७ मार्च रोजी घडली होती. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

बार्शी शहर पोलिसांनी याबाबत तपास करुन, सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी लक्ष्मी मोहन आसादे (वय ४३) रा. बच्चन पान दुकानाजवळ, मुर्गी नाला, लष्कर, सोलापूर हिला दि. १२ ऑगस्ट रोजी अटक करुन तिच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल चार तोळे वजनाच्या दोन पाटल्या (किंमत १ लाख २० हजार रुपये) हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

सदर महिलेविरुध्द सोलापूर येथील एमआयडीसी व जेलरोड पोलिस ठाण्यात याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे, स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, स.पो.उ.नि. अजित वरपे, पो.हे.कॉ. अरुण माळी, पो.ना. मनिष पवार, वैभव ठेंगल, पो.अंमलदार ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगिल, अर्जुन गोसावी, रवि लगदिवे, सचिन देशमुख, अविनाश पवार, महिला पो.अंमलदार आरती खोत यांनी पार पाडली.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)