वारकऱ्यांसाठी भगवंत मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Admin
0

 

https://www.barshivishesh.in

https://www.barshivishesh.in
Free health check-up camp for Warkaris held at Bhagwant Mandir

बार्शी विशेष : आषाढी वारीसाठी पंढरपूरला चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लायन्स क्लब व लायन्स क्लब, चेतना, बार्शी तसेच वृक्ष संवर्धन समिती, डॉक्टर्स सेल, बार्शी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसेच लायन्स क्लब चेतनाच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्या दररोज भगवंत मंदिरात मुक्कामी असतात, त्यामधील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरात, डॉ. प्रशांत मांजरे, डॉ. वासुदेव सावंत, डॉ. विनायक हागरे, डॉ. प्रविण मिरगणे, डॉ. श्रीराम देशमुख, डॉ. केशवराज मुळे, डॉ. मिलिंद चौधरी या डॉक्टरांनी सहभाग घेऊन वारकऱ्यांची तपासणी केली. सुमारे ११०० पेक्षा अधिक वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.

यावेळी रिजन चेअरमन ला.बापूसाहेब कदम, रिजन सेक्रेटरी ला.अॅड.विकास जाधव, ला.कल्याणी साहेब, ला.अक्षय बंडेवार, ला.गिरिष शेटे, ला.प्रशांत पंडित, ला.बंडुशेठ भराडिया, ला.संतोष जोशी, ला.गोवर्धन जाजू, लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष ला.संदिप नागणे, चेतनाच्या अध्यक्षा ला.गायत्री बंडेवार, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा लायन्स क्लब बार्शीचे सेक्रेटरी उमेश काळे, महिला आघाडीच्या सायरा मुल्ला आदी उपस्थित होते.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राणाप्रताप देशमुख, महेश बकशेट्टी, उमेश नलवडे, राहुल तावरे, अक्षय भुईटे, ला.पुनम लड्डा, ला. वर्षा साखरे, ला.वंदना देवणे, ला.श्रद्धा लड्डा, ला.पूजा गोदने, ला.विद्या नागणे, रेखा विधाते, अनुसया आगलावे, आशादेवी स्वामी आदींनी विषेश परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)